वेट लॉस आणि फॅट लॉस मधील फरक समजून घेणे खूप महत्वाचे आहे. तर चला आज आपण दोन्ही मधला फरक समजून घेऊ, म्हणजे नवीन वर्षाचा नवीन निर्धार करायला तुम्हाला सोपं जाईल.
Table of Contents
जेव्हा आपण वजन कमी करण्याचा विचार करतो तेव्हा आपण नक्की कशावर लक्ष किवा प्राधान्य दिले पाहिजे लक्षात घेतले पाहिजे. तसं पाहिलं तर दोन्ही पर्याय हे शरीर स्लिमिंग साठी वापरल्या जातात.
पण ह्या दोन्ही मधील फरक समजून घेणे गरजेचे आहे, कारण बर्याच वेळा आपण चुकीच्या मार्गाने वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो व थोड्या दिवसाने अपेक्षित परिणाम न दिसल्याने बंद करतो.

फॅट लॉस म्हणजे काय ? व कसा करावा.
फॅट म्हणजेच चरबी, फॅट लॉस मध्ये आपण आपल्या शरीरामधील अतिरिक्त फॅट कमी करण्याचा प्रयत्न करत असतो पण हा लॉस शरीरातील लिन मांसचा न होता फॅटचा असला पाहिजे.
जेव्हां आपण फॅट लॉस करतो तेव्हा शरीरातील स्नायूंनचा लॉस होत नाही किवां खूप थोड्या प्रमाणावर होतो.
फॅट लॉस करायचा सोपा मार्ग म्हणजे योग्य व्यायाम आणि कमी कॅलरी असणारा आहार घेणे, फॅट लॉस मध्ये आपल्याला एकदम वजनात फरक दिसत नाही पण दीर्घकालीन फायदा नक्की होतो.
जर तुम्हाला दीर्घकालीन परिणाम व टोन शरीर पाहिजे असेल तर तुम्ही फॅट लॉस केला पाहिजे आणि फॅट लॉस हा प्रत्येकाच्या शरीररचने वर अवलंबून असतो,
वेट लॉस म्हणजे काय ?
वेट लॉस मध्ये आपण ओवरऑल शरीराचे वजन कमी करत असतो, ज्यामध्ये शरीरातील स्नायूं, चरबी आणि पाण्याचे वजन हे असते.
वेट लॉस मध्ये आपण स्नायूंचा सुद्धा लॉस करत असतो जेच्या मुळे आपल्याला वेट लॉस करत असताना थकल्या सारखे किवां ताकद कमी पडल्या सारखे वाटते.
वेट लॉस करताना आपल्याला हलके वाटते, पण शरीरातील उर्जा कमी असल्याचा पण अनुभव होतो. वजन कमी करताना निरोगी राहणे हे सुद्धा गरजेचे आहे, त्यामुळे वेट लॉस रुटिंग जास्त दिवसा पर्यन्त करणे अवघड जाते.
वेट लॉस हा सुद्धा प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे वेगळे परिणाम दाखवतो त्या मुळे प्रत्येकालाच थकवा येणे किवां त्याचा त्रास होणे दिसून येत नाही.

तर मग नक्की कोणता मार्ग निवडावा ? फॅट लॉस किवां वेट लॉस हा प्रत्येकाच्या शरीररचने वर अवलंबून असतो, पण दीर्घकालीन परिणामानसाठी फॅट लॉस हा जास्त उपयोगी ठरू शकतो.
आता तुम्ही दोन्ही मधील फरक समजून घेतला आहे, सगळ्यात महत्वाची म्हणजे तुमची ठरवलेल्या कामा विषयी इच्छाशक्ती आणि जेव्हां एखादे काम इच्छाशक्ती प्रबळ ठेवून केले जाते तेव्हा ती आपली सवय बनत जाते.
अश्या प्रकारच्या सवयीं कशा लागतात आणि त्यांचा फायदा आपण लक्ष गाठण्यासाठी कसा करावा ह्या साठी आपल्या ब्लॉगवरील सवयींचे विज्ञानं ही post जरूर वाचा.
नवीन चर्चेचा कट्टा भरू पर्यन्त तुमच्यासाठी १ वैचारिक कीडा – फॅट लॉस हा फक्त आहारावर नियंत्रण मिळवून साध्य होऊ शकतो का ?
तर comment मध्ये आम्हाला सुद्धा कळवा तुम्ही कोणता पर्याय निवडला आणि का ?, अश्याच नवीन विषयावरच्या कट्ट्या साठी आपल्या ब्लॉगला follow करा.
मराठी गीक्सवरील सर्व सामग्री आणि माध्यमे केवळ माहितीच्या उद्देशाने ऑनलाइन तयार आणि प्रकाशित केली जातात. हे व्यावसायिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय बनण्याचा हेतू नाही आणि आरोग्य किंवा वैयक्तिक सल्ला म्हणून त्यावर अवलंबून राहू नये. नेहमी तुमच्या डॉक्टरांचे किंवा आरोग्य व्यावसायिकांचे मार्गदर्शन घ्या.