एक्सेल

मायक्रोसॉफ्ट एक्सेल मराठी माहिती | Microsoft Excel Information in Marathi

Excel in Marathi, एक्सेल मराठीत, एक्सेल, एक्सेल ट्रिक्स, Excel Tricks.

Table of Contents

प्रस्तावना | introduction

आजच्या आधुनिक जगात एक्सेल सारखी साधने वापरणे ही काळाची गरज आहे, तर ते नुसते वापरता येण गरजेचं नसून तुम्ही ते किती चांगल्या प्रकारे व पण किती जलद गतीने करता हे महत्वाचे आहे.

त्यासाठी तुम्हाला त्यामधील काही शॉर्टकट्स, कार्ये, ट्रिक्स ह्या माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे तुमच्या कामातील स्पीड तर वाढेलच पण कार्यप्रदर्शना मध्ये सुधा इम्प्रोव्हायझेशन दिसेल.

आज स्पर्धेच्या युगामध्ये डेटा हा सर्वात महत्वाच साधनं झालेले असून ज्याच्याकडे सर्वात जास्त अचूक डेटा असेल त्याला जास्त मागणी आहे. आज A.I किवां कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र वापरण्याच प्रमाण वाढलेलं असल्यामुळे डेटा हा मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो आहे, गरज आहे ती फक्त त्याला प्रक्रिया करण्याची.

तसेच एक्सेल मध्ये आपण पगार पत्रक (Salary Sheet), विक्री अहवाल(Sales Report), उत्पन्न विवरण(Income Statement), खर्च अहवाल(Expense Report) आणि आजून बरेच काही कामे करू शकतो.

मराठी Geeks च्या ह्या ब्लॉगच्या सिरीज मध्ये आपण अश्याप्रकारच्या ट्रिक्स, शॉर्टकट्स, सूत्रे घेऊन येणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अचूकता, स्पीड वाढवायला मदत होईल, व तुम्ही तुमच्या कामातील वेगळेपण व कौशल्य दाखवू शकाल.

1. एक्सेल मध्ये डेटा कसा इम्पोर्ट करावा? |1. How to import data into Excel?

आपल्याकडे डेटा हा मुबलक आहे, आपण आता तो आपल्याला एक्सेल मध्ये इम्पोर्ट करायचा आहे त्याशिवाय आपल्याला त्यावर काम करणे शक्य नाही. त्यासाठी आपण पहिल्यांदा डेटा कसा इम्पोर्ट करायचा हे पाहू.

एक्सेल मध्ये डेटा इम्पोर्ट करण्याचे काही मुख्य पर्याय आपण पाहणार आहोत. आपल्याकडे डेटा हा .TXT स्वरूपा मध्ये किवां .CSV स्वरूपा मध्ये असला तर तो आपण एक्सेला इम्पोर्ट करू शकतो.

त्याशिवाय तुमच्या वेबसाईट वर जर टेबल मध्ये डेटा असेल किवां एक्सेल शीट असेल तर तो आपण लिंक ने सुधा इम्पोर्ट करू शकतो.

वरील फोटो स्लाइड मध्ये डेटा इम्पोर्ट करण्यासाठी चे पर्याय तुम्हाला दिसतील.

पहिल्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे डेटा टॅब वर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुम्हाला दुसऱ्या फोटो प्रमाणे पर्याय दिसतील.

आपण जास्त वापरले जाणारे म्हणजे इम्पोर्ट फ्रॉम वेब आणि इम्पोर्ट फ्रॉम .TXT किवां .Csv हे पर्याय पाहणार आहोत.

इम्पोर्ट फ्रॉम वेब | Import from Web:

वरील फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे डेटा टॅब वर क्लिक करा, तिथे दिसत असलेल्या पर्याय मधील दुसरा पर्याय निवडा. व तुम्हाला पाहिजे असलेल्या साईटचा Url  बॉक्स मध्ये पेस्ट करा व go बटनावर क्लिक करा.

पहिल्या फोटो मध्ये आपण आपल्या मराठी geeks ह्या साईटचा Url पेस्ट केलेला आहे . दुसऱ्या फोटो मध्ये साईटचे होम पेज तुम्हाला दिसेल तसेच तिथे खाली इम्पोर्ट बटना वर क्लिक केले कि आपल्या साईट च्या होम पेज मधील डेटा एक्सेल मध्ये इम्पोर्ट होईल.

जर तुमच्या साईट वर जर जास्त डेटा असेल तर थोडा वेळ लागू शकतो, तरी मधून मधून रेफ्रेश करावे. त्यासाठी परत डेटा tab वर जाऊन तिथे देलेले रेफ्रेश बटन वापरावे.

इम्पोर्ट फ्रॉम Csv/Txt | Import from Csv/Txt:

ह्या पर्यायासाठी डेटा tab मधील तिसऱ्या बटणा वर क्लिक करा, त्यानंतर एक्सेल तुम्हाला पहिल्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे import tab दाखवेल त्यामध्ये तुम्हाला तुमची फाईल शोधून इम्पोर्ट करायची आहे.

नंतर तुमच्या समोर दुसऱ्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे Text import Wizard उघडेल त्यामध्ये तुम्हाला तीन steps दिसतील. पहिल्या step मध्ये आपल्यला limiters ठरवायचे आहेत, म्हणजेच जिथून तुमचा नवीन कॉलम सुरु होतो ती जागा तुम्हाला ठरवायची आहे.

त्यामध्ये तुम्ही Fixed width म्हणजेच ज्या फाईल मध्ये २ कॉलम मधील जागा किवा स्पेस ही समान किवां ठरलेली आहे, आणि दुसरे म्हणजे Delimited म्हणजे डेटा मध्ये अशी काही चिन्हे आहेत जिथून नवीन कॉलम सुरु होतो.

आपल्या डेटा मध्ये Delimited value आहेत म्हणून आपण Delimited हा पर्याय निवडले आहे.

तुम्ही त्यासाठी रिकामी जागा(blank space) किवां “,” वापरू शकतात, वरील फाईल मध्ये “,” आहे त्यामुळे आपण पहिलाच पर्याय निवडला आहे.

दुसऱ्या step मध्ये आपल्याला मागील step मध्ये दिलेल्या limiter चे स्वरुप विचारला आहे, इथे आपल्याला अधिक पर्याय दिसतील, इथे आपण कॉमा पर्याय निवडला आहे. तसेच तेथे खाली इतर पार्याय सुद्धा दिसतात.

तिसऱ्या पर्याया मध्ये आपल्याला डेटा फॉरमॅट निवडायचा आहे, जर डेटा हा नंबर, तारीख, किवां  मजकूर ह्या पैकी कोणत्या फॉरमॅट मध्ये आपण सेट करू शकतो, आता आपण General फॉरमॅट मध्ये डेटा ठेवला आहे, म्हणजे आपण येथे काही बदल न करता फिनिश वर क्लिक केले.

खाली Text import Wizard मध्ये आपल्याला preview पाहायला मिळतो.

शेवटच्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला एक्सेल मध्ये डेटा कोणत्या कॉलम पासून सुरु करायचा हे आपल्याला ठरवायचे आहे.त्यासाठी आपल्याला फक्त कॉलम निवडायचा आहे एक्सेल त्या कॉलम पासून पुढे डेटा पेस्ट करेल.

तर अश्या प्रकारे आपण डेटा एक्सेल मध्ये कसा इम्पोर्ट करायचा हे आज शिकलो. पुढील ब्लॉग मध्ये आपण इम्पोर्ट केलेला डेटा क्लीन तसेच त्यावर ऑपरेशन्स करायला शिकणार आहोत.

तुमच्‍या इनबॉक्‍समध्‍ये वितरीत, विलक्षण, आश्चर्यकारक आणि प्रभावशाली कथा मिळवा.

4 thoughts on “मायक्रोसॉफ्ट एक्सेल मराठी माहिती | Microsoft Excel Information in Marathi”

  1. Pingback: मायक्रोसॉफ्ट एक्सेल मराठी माहिती २ | Microsoft Excel Information in Marathi 2 - Marathi Geeks

  2. Pingback: डिजिटल मार्केटिंग | Digital Marketing | Marathi Geeks

  3. Pingback: वेळ वाचवणाऱ्या एमएस एक्सेल ट्रिक आणि टिप्स भाग ३ |Time-savings ms excel tips Marathi Geeks

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

तुमच्‍या इनबॉक्‍समध्‍ये वितरीत, विलक्षण, आश्चर्यकारक आणि प्रभावशाली कथा मिळवा

FOLLOW US