Facts, तथ्ये, 5 यादृच्छिक तथ्ये, 5 Random Facts.
Table of Contents
तुमच्या जिभेने चव ओळखायच बंद केला तर ?

तुम्हाला माहिती आहे का जर तुम्ही तुमच्या जीभेला टिशू पेपर ने कोरडी केली आणि तिच्या वर तुमच्या आवडीचा पदार्थ ठेवला तर तुम्हाला त्या पदार्थाची चव समजू शकत नाही.
पण अस का ? गोधळा मध्ये पडला ना? त्याला कारण म्हणजे आपल्या तोंडातील लाळ, लाळ अन्नात मिसळून जिभेला चव ओळखायला मदत करत असते आणि जिभ कोरडी असेल तर ही प्रक्रिया होत नाही व चव समजायला अवघड जाते.
पाण्यात तरंगणारा ग्रह ?
खरंच ग्रह पाण्यात तरंगू शकतो ? जर तुम्ही शनि ग्रह मावेल इतका मोठा तलाव शोधला आणि त्यामध्ये शनि ग्रह टाकला तर तो पाण्याच्या वर तरंगेल, पण हे कसं शक्य आहे ?
तर शनि ग्रह हा वायू ग्रह आहे, असे म्हणतात की तो ९४% हायड्रोजन, 6% हेलियम आणि अजून काही वायू पासून बनला आहे. आणि हे सर्व वायू पाण्यापेक्षा हलके आहेत. म्हणून शनि ग्रह हा पाण्यावर तरंगू शकतो.
डोळे आहेत का मायक्रोस्कोप ?

कधी कधी एकटक पाहत असतांना मुख्यता सूर्यप्रकाशामध्ये आपल्याला अचानक १-२ सेकंद साठी डोळ्यांवर लहान लहान रेषा सारख काही तरी दिसू लागत काय आहे हे ? डोळ्यामधील सूक्ष्म जीवाणू ?
तर नाही ते कोणते ही सूक्ष्म जीवाणू नाहीत तर ते आपल्या डोळ्यामधील केशिका मध्ये फिरणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी आहेत.
बर्याच वेळेस आपण आपल्याला कोणी सांगू पर्यन्त आपण अश्या छोट्या गोष्टीन कडे लक्ष देत नाही. तर बाहेर पडा आणि आपल्या डोळ्यांनी डोळ्यामधील केशिका पहा.
अंतरिक्ष आपल्याशी रेडिओ द्वारे संपर्क करतो आहे ?
तुम्हाला अनुभव आला असेल जेव्हा तुम्ही रेडिओ वर तुमच्या आवडतीचा चॅनल लावत असता तेव्हा ते लावताना मध्ये खर-खर ऐकू येते तो कशाचा आवाज असतो ? ही खर-खर अंतरीक्ष मध्ये राहणार्यांनी पाठवलेला संदेश आहे का ?
घाबरून जाऊ नका हा आवाज जरी अंतरीक्ष मधील असला तरी तो कोणता ही संदेश नाही. शास्त्रज्ञच्या मते हा आवाज अंतराला मधूनच येतो आणि तो बिग बँग(पृथ्वीच्या निर्माणाचा सिद्धांत) च्या वेळेचा सुद्धा असू शकतो.
तर रेडिओ सुरु करा आणि जाणून घ्या पृथ्वीच्या निर्माणाचा सिद्धांत.
जिथे कमी तिथे आम्ही
भारत देश मसाल्यांचे माहेर घर म्हणून जगामध्ये ओळखला जातो. भारतामध्ये १८० प्रकारचे मसाले मिळतात. व भारता मधून हे सर्व मसाले जगभर विकले जातात.
भारताच्या ह्याच वैशिठ्या मुळे इंग्रज व्यापारासाठी आले होते आणि पुढचा सर्व इतिहास आपल्याला माहिती आहेच.

भारतामध्ये जगातली सर्वात महागडे घर म्हणजे 2 दशलक्ष डॉलर्सचे “फक्त” ,ह्या बंगल्याचे नाव एंटीलिया असे आहे. हा बंगला मुकेश अंबानी ह्यांचे आहे. घरा मध्ये सिनेमा गृह, 160 गाड्या पार्क होतील इतक मोठ पार्किग, आणि ३ हेलिपॅड आणि अजून बरेच काही आहे.
पाण्याला वास नसतो मग पावसाच्या पाण्याला वास कसा काय ?
घरच्या पाण्याचा जर कधी वास घेऊन पहिला तर आपल्याला त्याचा वेगळा असा काहीच वास येत नाही, पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा किती सुंदर वास येतो तो कसा ? तुम्ही म्हणाल की तो वास मातीचा असतो, पण फक्त मातीचा वास असतो का तो ?
तर पाऊस जमिनी वर पोहचू पर्यंत तो पृथ्वीच्या काही लेयेर्स मधून जातो, तेव्हा त्यामध्ये ओझोन वायूचा तसेच वाढत्या प्रदूषणा मुळे प्रदूषणाचा सुद्धा त्यात समावेश होतो. जमिनीवर आल्यावर झाडांनी बाहेर टाकलेली तेल, तसेच जमिनी मध्ये असलेले जिवाणू ह्या सर्वांचा एकत्रित वास हा आपल्याला येत असतो, व त्याला आपण पाऊसाचा वास असे म्हणतो.
सर्वात गतीशिल कोण माणूस का संगणक ?

तुमचा मेंदू जर एखाद्या कॉम्पुटर प्रमाणे काम करू लागला तर तो 38 हजार ट्रिलियन ऑपरेशन्स प्रत्येक सेकंद मध्ये करू शकतो, म्हणजे आपला मेंदू तितक्या क्षमतेचा आहे. आणि हा स्पीड जर तुम्ही आज जगातील सर्वात फास्ट किवां आपण त्याला सुपर कॉम्पुटर म्हणतो तेच्या सोबत तुलना केली तर ते फक्त 0.002% काम करतो.
मेंदूला सवयी कशा लागतात, सवयी म्हणजे काय, त्या काम कसा करता ह्यावर आपल्या वैचारिक कट्ट्यावर आपण चर्चा केली आहे ती नक्की वाचा.
तर ह्या ब्लॉग मधील facts तुम्हालाकश्या वाटल्या आम्हाला सांगा.