brown brain decor in selective-focus photography

सवयींचे विज्ञान| The Science of Habits.

The Science of Habits, सवयींचे विज्ञान, savayiche vidnyan, सवयी काय आहेत व त्याचे विज्ञानं.

सवय म्हणजे काय विचारलं तर बरेचं जण पटकन सांगू शकतील – जे आपण रोज नित्य नियमाने  करतो किवां नियमित प्रवृत्ती म्हणजे सवय, बऱ्याचदा ज्यामधून आपल्याला फायदा होतो. पण खरंच सवयी इतक्या म्हणतो तितक्या समजायला सोप्या आहेत?

आज आपण मराठी Geeks च्या वैचारिक कट्ट्याच्या ह्या भागात ह्याच विचारावर चर्चा करणार आहोत. आपल्यापैकी बर्याच जणांसाठी, मागील काही वर्षांच्या खोलवर रुजलेल्या सवयींना व्यत्यय आणला आहे, आणि बरेचं जण त्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत.

तर चला पाहू ह्याच सवयींचे विज्ञानं.

जीवशास्त्राच्या आधारे, सवयी कशा दिसतात? |Based on biology, what do habits look like?

सवयी ह्या एका शॉर्टकटसारख्या असतात, हे शॉर्टकट आपण एखादी गोष्ट सातत्याने केल्याने बनतात. मेंदूचा बेसल गॅंग्लिया हा भाग सवयी बनण्याची जागा आहे, तसेच भावना, स्मृती ह्यांच्या विकासासोबत सुधा हा भाग निगडीत आहे.

सवयी नक्की कशा दिसतात ? हा प्रश्न तर तसाच आहे, तर सवयी म्हणजेच डेंड्राइट्सद्वारे जोडलेल्या न्यूरॉन्सचा न्यूरल मार्ग असे म्हणता येयील.डेंड्राइट्स हे झाडांच्या फांद्यान प्रमाणे शाखेत विखुरलेले असतात,सवय ही एक क्रिया म्हणून सुरू होते व जी पुरेशी पुनरावृत्ती केल्यास, ती अधिक मजबूत बनत जाते.

म्हणजे सवयी ह्या एका मोठ्या जाळ्या प्रमाणे दिसतात, जे काम जितक्या जास्त सातत्याने केले जाते तितक डेंड्राइट्सचे जाळे आधी मजबूत बनते व एका वेळे नंतर ते काम आपली सवय बनत जाते. 

उदाहरणार्थ सकाळी उठल्यावर आपण किती तरी वेळा अर्ध्या झोपेत सुद्धा दातांना ब्रश करतो ते कसे?  तर ती आपली सवय झाली आहे व ती इतक्या वेळा केली गेली आहे कि ती करायला आता आपल्याला विचार करायला लागत नाही.

शास्त्रज्ञ अस म्हणतात कि आपण दिवसभर जे काम करतो त्या मध्ये 40% सवयींचा समावेश असतो.

मेंदू अवचेतनपणे कसे कार्य करतो?| How the brain works subconsciously?

मेंदू अवचेतनपणे कसे कार्य करतो म्हणजेच तो लागलेल्या सवयी स्वयंचलित कसा करतो? ते पाहणार आहोत.

सवयीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्या सभोवतालच्या संकेतांद्वारे ट्रिगर केली जाते. उदाहरणार्थ काही जणांना ४ वाजले कि चहा प्यायची तलप येते, ह्या उदाहरणामध्ये वेळ ही ट्रिगर प्रमाणे काम करत आहे.

ट्रिगर ही वेळ, एखादी विशिष्ठ जागा, व्यक्ती सुद्धा असू शकते. ती व्यक्ती किवां वेळ येता आपल्या मेंदू ती क्रिया करण्यास सुरवात होते.

आपण पाहतो नवीन वर्षाच्या वेळेला जिम मध्ये किती जास्त गर्दी होते ,हे सुद्धा आपल्या मेंदू साठी एका ट्रिगर प्रमाणे काम करते, तसेच जेव्हा कधी आपल्या जीवनात काही मोठे बदल होत असतात जसे की नवीन जॉब, किवां नवीन घरात शिफ्ट होणे नवीन वर्षाची सुरवात अश्या बदलान सोबत आजून काही चांगल्या सवयी जोडणे किवां वाईट सवयी बंद करणे हे मेंदू साठी सोप्पे असते.

म्हणून आपल्याला नवीन वर्षाच्या सुरवातीला जिम मध्ये अशी गर्दी पाहायला मिळते.

सवय बदलणं खरंच अवघड आहे का? | It really difficult to change a habit?

सवयींचे विज्ञान

आपण सवय कशी लागते ते पहिले तसेच सवयी चे ट्रिगर सुद्धा पहिले, इतकी सगळी माहिती घेऊन सुद्धा आपल्याला काही सवयीन वर काहीच कंट्रोल का नसतो?

सवय लागण्यासाठी जितके ट्रिगर महत्वाचे आहेत तितकेच सवयी सोडवण्यासाठी सुद्धा ट्रिगर महत्वाचे असतात, तर आपण ट्रिगरच बदले तर काय होईल ? 

आपल्या मेंदूसाठी बदलाचा काळ हा सर्वात कठीण असतो, त्यामुळे ट्रिगर ओळखून त्यांना बदलण्यासाठी सुद्धा आपल्याला सातत्य लागते.

उदाहरणार्थ जेव्हा पाळायची किवां व्यायामाची सवय लावायची असते, तेव्हा झोपायच्या आधी कपडे, बूट, पाण्याची बाटली काढून ठेवणे हे करू शकता, म्हणजे सकाळी उठल्यावर कुठल्याही अडचणी शिवाय तुम्ही व्यायामाला जाऊ शकता.

ह्या उदाहरणा मध्ये अडचण किवां आपण त्याला कष्ट म्हणू जे ट्रिगर चे काम करता आहेत व त्या काम करण्यापासून आपल्याला थांबवते. 

आता ह्यात सातत्या साठी तुम्हाला ह्या सर्व गोष्ठी वारंवार केल्या पाहिजे व ते केल्यावर स्वतःला काही तरी बक्षीस दिले पाहिजे, म्हणजे पुढच्या दिवसासाठी ते प्रेरणा ठरेल, बक्षिसं म्हणजे तुम्ही व्यायाम झाल्यावर तुमच्या आवडीच्या फळाचा जुस पिऊ शकतात, म्हणजे ते तुमच्या तब्येती साठी सुद्धा चांगले राहील आणि त्या बक्षीस तुमच्या साठी ट्रिगर प्रमाणे काम करेल.

तर ह्या वैचारिक कट्ट्यावर आपण सवयी विषयी चर्चा केली, पुढील कट्टा भरूस पर्यन्त तुमच्या साठी  एक कीडा – कम्फर्ट झोन ही पण सवय आहे का ? असेल तर कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणे म्हणजे नक्की काय? विचार करा आणि आम्हाला सुद्धा comment मध्ये आपले विचार कळवा.

तुमच्‍या इनबॉक्‍समध्‍ये वितरीत, विलक्षण, आश्चर्यकारक आणि प्रभावशाली कथा मिळवा.

1 thought on “सवयींचे विज्ञान| The Science of Habits.”

  1. Pingback: अशी तथ्ये जी तुम्ही ऐकली नसतील | Marathi Geeks

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

तुमच्‍या इनबॉक्‍समध्‍ये वितरीत, विलक्षण, आश्चर्यकारक आणि प्रभावशाली कथा मिळवा

FOLLOW US