काय आहे डिजिटल मार्केटिंग? आणि डिजिटल मार्केटिंग Tools, बिझनेस online मंचावर मोठा करायचा आहे, पण पुढे काय करायचे समजत नाही? अश्या बर्याच प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत.
ह्या blog series मध्ये मराठी मधून समजेल अश्या सोप्या मांडणीत डिजिटल मार्केटिंग संकल्पना आपण समजून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंग व त्याच्या tools ची तोंड ओळख व त्यांचे वर्किंग समजून घेण्यास मदत होणार आहे.
Table of Contents
मार्केटिंग म्हणजे काय ?
सर्वात प्रथम मार्केटिंग म्हणजे काय? हे थोडक्यात समजून घेऊया. तर मार्केटिंग म्हणजे ग्राहकांची गरज, आवड आणि अडचण लक्षात घेऊन तेच्या वरील सोल्यूशन योग्य वेळेत तुमच्या टार्गेटेड ऑडियन्स परत पोहोचवणे होय. ह्या मध्ये सोल्यूशन हे तुमचे प्रॉडक्ट किवां तुमची सर्विस असेल.
मार्केटिंग मध्ये बाजारामधील ग्राहकांची गरज ओळखणे, त्या वर उपाय शोधणे व त्याचे वितरण करणे हे महत्वाचे मुद्दे आहेत.
डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय ?
डिजिटल मार्केटिंग म्हणजे Digital Tools, Digital Platform, Media Platform वापरुन केले जाणारे मार्केटिंग होय. आजच्या डिजिटल काळामध्ये इंटरनेट चा वापर वाढल्या कारणामुळे टार्गेटेड ऑडियन्स पर्यन्त पोहोचने हे शक्य झाले आहे.
पारंपरिक मार्केटिंग मध्ये वेळ तसेच पैसा हा डिजिटल मार्केटिंग पेक्षा जास्त लागतो तसेच आपल्या टार्गेटेड ऑडियन्स पर्यन्त आपली माहिती पोचते आहे का ह्याचा माग लावणे कठीण जाते.
डिजिटल मार्केटींगची गरज ही वेगाने वाढत आहे याचे मुख्य कारण म्हणजे इंटरनेट सेवा ही खूप स्वस्त होत आहे व स्मार्ट फोनचा वाढता वापर, यामुळे इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे, त्या मुळे आपला ब्रॅंड डिजिटल स्वरूपात असणे हे गरजेचे आहे.
डिजिटल मार्केटिंगचे सर्वात उत्तम उदाहरणं म्हणजे Amazon किव्हां कोणती ही online शॉपिंग साईट.
डिजिटल मार्केटिंगच का ?
- 24*7 व्यवसाय चालवता येतो.
- कमी वेळात योग्य ग्राहकांन पर्यन्त पोहोचता येत.
- कमी खर्च.
- अधिक नियंत्रण ठेवण्याची क्षमता.
- पारंपरिक मार्केटिंग पेक्षा अधिक मार्ग मिळतात.
- तुम्ही तुमचा ब्रॅड जागतिक पातळीवर पोचवू शकता.
- तुम्ही तुमच्या ब्रॅंड चे ट्रॅकिंग करू शकता.
- ऑनलाइन presence
- व्यवसायातील लवचिकता वाढवता येते.
- ग्राहकांशी संवाद साधता येतो ज्या मुळे फीड बॅक घेणे सोप्पे होते.

1. 24*7 व्यवसाय:
24*7 व्यवसाय म्हणजे तुम्ही तुमच्या ब्रांडच्या नावाने वेबसाईट सुरु करू शकता जिथे तुम्ही सतत उपलब्ध राहण्याची गरज पडत नाही, पण ग्राहकांना पडलेल्या प्रश्नाची उत्तरे मात्र तुम्हाला द्यावी लागतात, त्यासाठी तुम्ही Email ID किवां कॉम्पुटर बॉट चा सुद्धा वापर करू शकता.
कॉम्पुटर बॉट हा एक प्रोग्राम आहे, ज्यामध्ये अपेक्षित प्रश्नाची अपेक्षित उत्तरं लिहून ठेवली असतात, व ग्राहकांन द्वारे जर आपण नोंदवलेल्या प्रश्ना मधील प्रश्न विचारल्यास आपण नोदावलेले उत्तर ग्राहकांना मिळते.
तसेच तुम्ही ब्रांडची जाहिरात सोसिअल प्लॅटफॉर्म वर करू शकता ज्यामुळे तुम्ही नसतांना सुद्धा तुमच्या उत्पादनाची विक्री होत राहील.
२. कमी वेळात योग्य ग्राहकांन पर्यन्त पोहोचणे:
डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने तुम्ही तुमची सेवा अथवा प्रॉडक्ट विकत घेण्यास इच्छुक अशा ग्राहकांन पर्यन्त अगदी सोप्या मार्गाने पोहचू शकता.
त्यासाठी तुम्ही प्रदर्शित करत असलेल्या जाहिराती किवां उत्पादन मोहीम (product campaign) फिलटर्स लावून तुमच्या सेवा अथवा प्रॉडक्ट विकत घेण्यास इच्छुक असणाऱ्या ग्राहकांना दाखवू शकता.
उदरणार्थ: तुमची जाहिरात २० ते ३० ह्या वयोगटातील लोकांना दिसावी किवां तुमचे टार्गेटेड ऑडियन्स हे ह्या वयोगटातील असतील तर ते तुम्ही सहज करू शकता. त्याच सोबत लिंग, शहर, कीवर्ड हे सुद्धा फिल्टर तुम्ही वापरू शकता.
३.कमी खर्च:
टार्गेटेड ग्राहकांनाच जाहिरात दाखवल्या मुळे खर्च कमी होतो व जास्ती फायदा करून घेता येतो.
डिजिटल मार्केटिंग मुळे आपल्याला पारंपारिक कोणत्याही साधनाचा म्हणजे उदारणार्थ माहिती पत्रक, कार्ड्स वाटणे, असे काही करावे लागत नाही व ह्या सर्व गोष्टीन वर लागणारा वेळ व पैसा वाचतो.
४.अधिक नियंत्रण:
जेव्हां आपण डिजिटल मार्केटिंग tools वापरून मार्केटिंग करतो तेव्हा आपल्याला बर्याच प्रकारची म्हणजे, तुमच्या वेबसाइट वर कोणत्या देशातले तसेच कोणत्या वयोगटाचे लोक भेट देता आहेत, जाहिराती वर कोणत्या मंचावरील लोकांचे क्लिक जास्त आहेत, तसेच त्यांची जाहिराती वरील प्रतिक्रिया, त्यांनी वेबसाइट वर किती वेळ दिला, त्यात काय पहिले किती क्लिक केले ही सर्व माहिती तुम्हाला समजते व योग्य ग्राहकांन पर्यन्त पोहचण्यास आपल्याला मदत होते.
५. तुम्ही तुमचा ब्रांड जागतिक पातळीवर पोचवू शकता:
online किवां डिजिटल मार्केटिंगच्या tools वापरून आपण आपला ब्रांड जागतिक पातळीवर सुद्धा प्रदर्शित करू शकतो, फक्त गरज असते ती म्हणजे वितरण करणाऱ्या कंपन्यांची.
ह्या मुळे तुम्ही घराच्या बाहेर न पडता तुमचे उत्पादन जागतिक बाजार पेठे मध्ये विकू शकता व तुमचा ब्रांड जागतिक पातळीवर पोचवू शकता.
तर आपण ह्या ब्लॉग मध्ये डिजिटल मार्केटिंग का महत्वाचे आहे, तसेच पारंपारिक व डिजिटल मार्केटिंग मधला फरक काय आहे हे पाहिले, तर तुमच्या सुद्धा ब्रांडला डिजिटल मार्केटिंग ची जोड देण्यासाठी व डिजिटल उपस्थिती वाढवण्यासाठी “फ्री डिजिटल मार्केटिंगच्या कोर्सेची” प्लेलिस्ट पाहत रहा आणि आपल्या मराठी Geeks ब्लॉगला subscribe करा.
एक्सेल मधील नवीन ट्रिक्स, आणि सूत्र शिकण्यासाठी आपल्या एक्सेल कोर्सेची प्लेलिस्ट पाहायला विसरू नका.
हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कळवा, व तुमचे जर कोणते प्रश्न असतील तर ते सुद्धा आम्हाला कळवा आम्ही ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू.
1 thought on “डिजिटल मार्केटिंग | Digital Marketing”
Best of luck!